’83’ हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लालच्या भूमिकेत दिसणार आहे जिथे ते 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा विजयाला रीक्रिएट करतील.
View this post on Instagram
चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या असेट्समध्ये कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजविषयीचा खुलासा केला. मदन लाल हे 1983 च्या विश्वचषकातील सर्वात प्रभावी गोलंदाज होते.
रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
रिलायंस एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 83 ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स चा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 3डी रिलीज होणार आहे.
कमल हसन यांची राजकमल फिल्म्स इंटरनेशनल, अक्किनेनी नागार्जुन यांची अन्नपूर्णा स्टूडियो, पृथ्वीराज प्रोडक्शंस यांनी चित्रपटाचे अनुक्रमे तामिळ, तेलुगु आणि मलयाळम व्हर्जनकरिता रिलायंस एंटरटेनमेंट सोबत एकत्र आले आहेत. पृथ्वीराज प्रोडक्शन आणि किच्छा सुदीपा यांची शालिनी आर्ट्स फिल्म मलयाळम आणि कन्नड व्हर्जन प्रस्तुत करण्यासाठी तयार आहेत.
चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.