बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या नृत्य कौशल्याने चाहत्यांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नोराने अनेक चित्रपटांमधून आपल्या डान्सचा जलवा दाखविला आहे. ती सोशल मीडियावरदेखील खूप ऍक्टिव्ह असते.
View this post on Instagram
ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. नोरा फतेहीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती जलपरीच्या अवतारामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यात नोराने पिंक, ब्ल्यू आणि गोल्डन कलरचा जलपरी ड्रेस परिधान केलेला आहे. हा जलपरीचा लुक पूर्ण करण्यासाठी तिने व्हाईट बिकिनी घातलेली आहे. यासोबतच तिने आपल्या केसांनाही कलर केला आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “जोपर्यंत तू समुद्रात आहे, तोपर्यंत तुला नियमांचे पालन करावे लागेल. यामुळे मी त्याचा त्याग केला.’ दरम्यान, नोराचा हा लुक “डान्स मेरी राणी’ या व्हिडिओ सॉंगमधील आहे. याबाबत टी-सीरिजकडून माहिती देण्यात आली. या व्हिडिओतील गाणे गुरू रंधावा यांनी गायले आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोरा फतेहीला “दिलबर’ आणि “गर्मी’ या स्पेशल सॉंगमुळे प्रसिद्धी मिळाली. तसेच तिने “स्ट्रीट डान्सर-3डी’, “बाटला हाउस’, “भूज’ आणि “स्त्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्णायक भूमिका साकारल्या आहेत.