Esha dey with Ranveer Singh| ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. यातच आता या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ईशा डे हिला मोठी संधी मिळाली आहे. एका जाहिरातीसाठी ईशाने बॉलीवूडचा स्टार रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर केली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ईशाने इनस्टाग्रामवर रणवीरसोबतच्या जाहिरातीमधील फोटो शेअर केला आहे. यावर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांंनी कमेंट्स करत ईशावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या जाहिरातीची व्हिडिओ देखील तिने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यातून ईशाने रणवीरसोबत दलमिया सिमेंटच्या जाहिरातीत काम केल्याचे दिसते. सध्या तिच्या या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले आहे. Esha dey with Ranveer Singh|
View this post on Instagram
ईशाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, लंडनमधून तिने अभिनयाचं शिक्षण घेतले आहे. ईशाने ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती बॉबी देओलच्या ‘आश्रम-2’ या वेब सिरिजमध्येही झळकली होती. यातच तिने आता रणवीरसोबत देखील काम केले आहे. Esha dey with Ranveer Singh|
हेही वाचा:
भाजपची पाचवी यादी आज जाहीर होणार ?; ‘या’ 5 राज्यांतील नेत्यांना मिळणार उमेदवारी