Mukesh Khanna on Ranveer Singh| छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे शक्तिमान. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’च्या भूमिकेत छाप पाडली. आजही त्यांना या भूमिकेमुळेच खासकरून ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून भारताचा पहिला सुपर हिरो ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर येणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. यासाठी रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे देखील समोर आले होते. मात्र, रणवीर सिंगला ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी कास्ट केल्याच्या वृत्तामुळे मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंगच्या कास्टिंगच्या अफवांवर मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपला राग व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “संपूर्ण सोशल मीडिया अनेक महिन्यांपासून अफवांनी भरला होता की, रणवीर शक्तीमान करणार आहे आणि प्रत्येकजण याबद्दल नाराज होता, मी गप्प राहिलो. पण जेव्हा वाहिन्यांनी रणवीरला साइन केल्याची घोषणा सुरू केली तेव्हा मला तोंड उघडावे लागले. अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमान होऊ शकत नाही.” Mukesh Khanna on Ranveer Singh|
View this post on Instagram
रणवीर सिंगच्या नुकत्याच झालेल्या न्यूड फोटोशूटवरही खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. वास्तविक, रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. दरम्यान, मुकेश खन्ना यांच्या या पोस्टनंतर नवा वाद निर्माण होऊ शकतो. Mukesh Khanna on Ranveer Singh|
गेल्या महिन्यात आलेल्या रिपोर्ट्समध्ये ‘शक्तिमान’चे शूटिंग मे 2025 मध्ये सुरू होणार आहे, ज्यामध्ये रणवीर मुख्य भूमिकेत असेल आणि दिग्दर्शक बासिल जोसेफ याचे दिग्दर्शन करणार आहेत. तसेच शक्तिमान हा 90 च्या दशकातील सुपर हिरो असला तरीही आजच्या काळानुसार त्यामध्ये बदल देखील केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाची मोठी कारवाई ; गुजरात, उत्तर प्रदेशसह ‘या’ राज्यातील गृहसचिवांना हटवले