मुंबई – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अग्निहोत्री यांचा हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचं अमेरिकेत एक स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी अभिनेता आर माधवन उपस्थित होता. त्यानंतर अभिनेता आर माधवनने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
आर. माधवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “आर. माधवननं द व्हॅक्सिन वॉर चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी नुकताच द वॅक्सीन वॉर चित्रपट पाहिला. भारतीय वैज्ञानिक समुदायाचे बलिदान आणि कर्तृत्व पाहून थक्क झालो. ज्यांनी भारताची पहिली लस तयार केली आणि सर्वात आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवले त्यांची कथा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितली आहे. ही कथा तुम्हाला हसवेल आणि रडवेल सुद्धा… चित्रपटामधील कलाकारांनी चांगले काम केले आहे.’ यावेळी त्याने ‘चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहा आणि तुमच्या सुपरवुमनसाठी एक तिकीट नक्की खरेदी करा. ज्यांनी तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात मदत केली.’ असे म्हणत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ COVID-19 चित्रपट वैद्यकीय बंधुत्व आणि शास्त्रज्ञांच्या समर्थन आणि समर्पणाला श्रद्धांजली अर्पण करते. कोरोना महामारीशी लढण्यासाठी बनवलेल्या लसीसाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस बलिदान देणाऱ्यांची सत्यकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट यावर्षी 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, सप्तमी गौडा राइमा आणि अनुपम खेर यांची भूमिका असणार आहे.