मुंबई – बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ The Kashmir Files) या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले. नुकताच विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सिन वॉर ‘ (The Vaccine War) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात अपयशी ठरला.
यानंतर विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पर्व: एन एपिक टेल ऑफ धर्म’ असे आहे. एसएल भैरप्पा यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक महाभारताची कथा एका नव्या पद्धतीने सांगणार आहे. या चित्रपटात महाभारतातील पात्रांची कथा पाहायला मिळणार आहे. या पोस्टरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विवेक अग्निहोत्री यांचा ‘पर्व’ हा चित्रपट तीन भागामध्ये तयार केला जाणार आहे. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या घोषणेवर सोशल मीडियावर यूजर्स त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
BIG ANNOUNCEMENT:
Is Mahabharat HISTORY or MYTHOLOGY?
We, at @i_ambuddha are grateful to the almighty to be presenting Padma Bhushan Dr. SL Bhyrappa’s ‘modern classic’:
PARVA – AN EPIC TALE OF DHARMA.There is a reason why PARVA is called ‘Masterpiece of masterpieces’.
1/2 pic.twitter.com/BiRyClhT5c
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 21, 2023
विवेक अग्निहोत्रींनी ट्वीटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे. ‘पर्व’ हा चित्रपट एसएल भैरप्पा यांच्या ‘पर्व’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट तीन भागात बनण्यात येणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून महाभारतावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.