कानपूर – कानपूरच्या बेकनगंज भागात दोन गटांमध्ये दगडफेक आणि हिंसक संघर्षात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर, हल्लेखोरांनी डझनहून अधिक वाहनांची तोडफोड केली. या दगडफेकीत 35 हून अधिक लोक जखमी झाले.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 36 जणांची नावे दिली आहेत, तर 18 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. आज सकाळी पोलीस आयुक्त आणि डीएम यांनी पायी फिरून लोकांची चौकशी केली.
प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्याविरोधात शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. यावेळी रस्त्यावर आलेल्या हजारोंच्या जमावाने दगडफेक केली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांची तोडफोड सुरू केली. या दगडफेकीत 35 जण जखमी झाले. हिंसाचारानंतर पोलिसांनी एमएमए जोहर फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष हयात जफर हाश्मीचा शोध सुरू केला आहे. हाश्मी या घटनेचा सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कानपूरच्या घटनेबाबत एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, काही लोकांनी दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला, त्याला दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध केला. त्यामुळे हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.