चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे, असे बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्मा म्हणाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अनेकांकडून तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. मात्र, त्यानंतर आता काही लोक कनिकाच्या पाठिमागे उभे राहताना दिसत आहेत. याअगोदर अभिनेत्री सोनम कपूरने तिला पाठिंबा दिला होता. त्यापाठोपाठ माहिका शर्माने कनिकाची पाठराखण केली आहे.
चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे. कनिकाने जी चूक केली आहे ती पाहता तिला माफ करता येऊ शकत नाही. मात्र, तिच्यावर जे आरोप लावले आहेत त्याबाबत ती बरी झाल्यावरच निर्णय होईल. सध्या आपल्याला तिच्याप्रती माणुसकी दाखवायची गरज आहे, असे कनिका म्हणाली.
दरमयन, कनिका कपूर लंडनमध्ये होती. तिथून लखनौला परत आल्यावर तिने पार्टी आयोजित केली होती. पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंहसुद्धा उपस्थित होते. यांच्यासह जवळपास 500 पाहुण्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, फक्त राजकीय नेत्यांची तपासणी न करता गरिबांचीदेखील तपासणी व्हावी, अशी मागणी माहिकाने केली.