सॅनिटायझरला पर्याय ‘हायड्रोजन पेरॉक्‍साइड’चा

निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांचा दावा

पुणे – करोनाला दूर ठेवण्यासाठी बहुतांश नागरिक सॅनिटायझरचा सातत्याने वापर करत आहेत. परंतु, यातील घटक हातांसाठी घातक आहेत. सॅनिटायझरसाठी “हायड्रोजन पेरॉक्‍साइड’ हा चांगला पर्याय असल्याचे राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी सांगितले.

“करोनाची संसर्ग होऊ नये, यासाठी सध्या सॅनिटायझरचा नागरिक खूप वापर करत आहेत. परंतु, सॅनिटायझर घातक आहे. त्यात अमोनिया, अल्कोहोल असते. म्हणून आपले हात भाजत आहेत. यापासून नायट्रेट तयार होते. ते जमिनीसाठी आणि नदीसाठी खूप घातक आहे. आपण हात धुतल्यानंतर, ते पाणी गटारीमार्फत नदीत जाते. त्यावर आपल्याकडे पूर्वीपासूनचा एक चांगला उपाय असून, तो सोपा, स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे. हे पेरॉऑक्‍साइड कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध असते. एक लिटर हायड्रोजन पेरॉऑक्‍साइडमध्ये एक लिटर पाणी घाला आणि वापरावे, असे आवाहन डॉ. मोघे यांनी केले.

युरोपियन प्रोटेक्‍शन एजन्सीची मान्यता
जखम झाल्यास जंतू मरण्यासाठी हायड्रोजन पेरॉऑक्‍साईड वापरतो. तेच आपण वापरायला हवे. फक्त त्यात समप्रमाणात पाणी टाकून वापरायचे आहे. म्हणजे बाजारात 400 मिलीची बाटली फक्त 50 रूपयांत आहे. त्यात 400 मिली पाणी टाकायचे म्हणजे एक लिटर हायड्रोजन पेरॉक्‍साइड असेल तर त्यात एक लिटर पाणी टाका आणि वापरा. 5 ते 7 सेकंदात जंतू पाणी मरून जातील. हा उपाय युरोपियन प्रोटेक्‍शन एजन्सीकडून मान्यताप्राप्त झालेला आहे. म्हणून तो सर्वजण वापरू शकतात. तसेच आपण कपड्यांवर, शुजवर देखील लाऊ शकतो. कपड्यांवर जंतू असतील, तर ते देखील मरतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Subhash Padgaonkar says

    Be careful Do not use more than 3%concentraction to avoid skin burns

Leave A Reply

Your email address will not be published.