मुंबई – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगनाने भारतीय स्वातंत्र्याला भीक संबोधून अकलेचे तारे तोडले आहेत. कंगनाची या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत असला तरी काहींनी तिच्या या वक्तव्याचे समर्थन देखील केले आहे.
कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये अभिनेते विक्रम गोखले यांचा देखील समावेश आहे. यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने सुद्धा कंगनाला पाठिंबा दिला आहे.
मनीषा म्हणाली, बॉलीवूडमध्ये कंगना ही उत्तम व प्रभावी अभिनेत्री आहे.जेव्हा मी तिचा क्वीन चित्रपट पाहिला त्यावेळी मी तिच्या प्रेमात पडले होते. लोक तिला नाव ठेवतात मात्र मला विचाराल तर ती एक बुद्धीमान अभिनेत्री आहे. तिला अभिनयाची चांगली जाण आहे.
आज ती बॉलीवूडमध्ये एक सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेता येईल. त्यामुळे जे कोणी तिला नावं ठेवतात त्यांनी तिच्याबद्दल आपलं मत बदलण्याची गरज आहे, अशा शब्दांत मनीषाने कंगनाचं कौतुक केलं.