प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच आता तिच्याविरुद्ध ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेन्ड सुरू होता.
View this post on Instagram
रामायणावरील एका नवीन पौराणिक सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी करिना कपूरने 12 कोटी रुपये मानधन मागितल्याची चर्चेवरून हा ट्रेंड सुरु झाला होता. त्यांनंतर नेटिझन्स करिनाने सीतेचा रोल करून नये असं मतही सोशलवर मांडले होते.
View this post on Instagram
यातच हा रोल करीना नाही तर कंगना साकारत असल्याची घोषणा दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी सोशल मीडियावर केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकॉउंटवरूनही याची पुष्टी केली आहे.
View this post on Instagram
हा सिनेमा मोठ्या बजेटसह तयार केला जाणार आहे. याचे प्रॉडक्शन “बाहुबली’इतके मोठे असणार आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले.
View this post on Instagram
रामायणावर आधारित या सिनेमामध्ये व्हीएफएक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असेल. सीतेवर आणखीही काही चित्रपट बनत आहेत. आदिपुरुष या भगवान राम यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटात कृती सेनन सीता साकारत आहे. यात रामाची भूमिका प्रभास तर लंकेश रावणाची भूमिका सैफ अली खान करणार आहेत.