मुंबई – बॉलिवूडची पंगा क्विन अर्थात कंगणा राणावत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली कंगणा अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने सलमान खान आणि तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कंगणाने सलमान खानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती सलमान माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या ‘धक धक करने लगा’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. या गाण्यात तिने घाघरा-चोली घातली होती. यावेळी सलमान देखील ‘तू अप्रतिम दिसत आहे,’ असे म्हणत तिची प्रशंसा करतो. तिचा हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर सलमानला टॅग करत कंगणाने एक सवाल केला आहे. ‘OMG!!! SK आपण इतके तरुण का दिसतो?? याचा अर्थ आपण आता नाही का?’ असे ती म्हणते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सलमान आणि कंगणाला एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे.