मुंबई – समाजमाध्यमांवर मांडलेल्या आपल्या वादग्रस्त मतांमुळे अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच माध्यमांच्या प्रकाशझोतात असतात. अशातच आज कंगना यांनी विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर करत देशद्रोही व देशप्रेमी असण्यातला फरक स्पष्ट केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिल्लीमधील जेएनयूची माजी विद्यार्थी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केलेत. शेहला यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांनी, आपल्या मुलीचा देशाविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा केला आहे. तसेच शेहलापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही शोरा यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील पत्रच शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.
दरम्यान, शेहला यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांचा एक व्हिडीओ कंगना यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत कंगना यांनी, “देशद्रोह केल्याने तुम्हाला पैसे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, इतरांचा पाठिंबा हे सर्व काही मिळतं. मात्र देशावर प्रेम केल्यास तुमच्या वाट्याला शत्रू येतील, संघर्ष येईल, अन् पूर्वजांनी लढलेली लढाई येईल. तुमचं आयुष्य आहे, निर्णयही तुमचा असायला हवा. तुम्ही ठरवा समजूतदारपणाची लढाई लढायचीये की मूर्खतेची? मी तर जन्मजात मूर्ख आहे.” असा उपरोधिक संदेश लिहला आहे.
देशद्रोह से आपको पैसा, अंतरष्ट्रिया पुरस्कार, मित्र, सहयोग सब कुछ मिलेगा, मगर देशप्रेम से आपको दुश्मन मिलेंगे,संघर्ष मिलेगा, पूर्वजों की सभ्यता की लड़ाई विरासत में मिलेगी,आपकी ज़िंदगी है आपका निर्णय होना चाहिए,समझदारी की ज़िंदगी जीनी है या मूर्खता की?
मैं तो पैदाइशी मूर्ख हूँ 🙂 https://t.co/Ey1RpPZQjC— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 1, 2020
शेहला रशीद यांच्या वडिलांचे गंभीर आरोप
आपली पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही शेहलासोबत या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे. तसेच जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे.
आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशा विषयासंदर्भातील तीन पाणी पत्र शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवले आहे. यामध्ये त्यांनी शेहलावर गंभीर आरोप करतानाच आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे.