बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 10 कोटींची कमाई केली. दुसरीकडे तमिळ चित्रपट ‘वलिमै’, तर तेलगू चित्रपट ‘भीमला नायक’ने पहिल्याच दिवशी 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामुळे भलेही आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांची निराशा झाली असेल, पण बॉलीवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत खूप खूश आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.
कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सिनेमा हॉल रेकॉर्डब्रेक कलेक्शनसह पुनरुज्जीवित होत आहेत हे ऐकून आनंद झाला. मी ऐकले आहे की एक स्त्रीकेंद्रित चित्रपट, ज्यामध्ये एक मोठा नायक आणि सुपरस्टार दिग्दर्शक आहे, त्यासोबतच हिंदी पट्ट्यातही काही छोटी पावले उचलली जात आहेत. ही छोटी पावले असू शकतात, परंतु ती क्षुल्लक असू शकत नाहीत.”
कंगना पुढे लिहिते, “हे त्या सिनेमा हॉलसाठी हे महत्त्वाचे ठरेल जे व्हेंटिलेटरवर आहेत. आश्चर्यकारक! चित्रपट माफिया प्रसंगी उठून काहीतरी चांगले करतील, अशी अपेक्षाही केली नव्हती. त्यांनी केले तर आम्ही त्यांचे कौतुक करू. चला चांगल्यासाठी आशा करूया. ”