मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक ‘राम गोपाल वर्मा’ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक नवनवीन कलाकृती घडून आणल्या आहेत. त्यांनी ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’, ‘अटॅक ऑफ 26/11’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. आणि ते रुपेरी पडद्यावर हिट सुद्धा झाले आहेत. सिनेरसिक देखील त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.
यातच आता राम गोपाल वर्मा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘खतरा: डेंजरस’ असे असून, हा भारतातील पहिला लेस्बियन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा दोन महिलांमधील प्रेम आणि त्यांच्या समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. या पुरुषप्रधान समाजात जे असमाधानी आहेत ते एकमेकांकडे आकर्षित होतात.
Here’s telugu poster of DANGEROUS ..It’s India’s 1 st lesbian crime drama theatrically releasing on APRIL 8 th @NainaGtweets and @_apsara_rani #DangerousGirls pic.twitter.com/lWNzxAoSOR
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 24, 2022
या क्राईम थ्रिलर-ड्रामा चित्रपटात अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटात साऊथ चित्रपटातील हॉट सायरन्स अप्सरा राणी आणि नयना गांगुली मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, राम गोपाल वर्मा यांचा ‘खतरा : डेंजरस’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला असून, 8 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
GREAT NEWS ! DANGEROUS: KHATRA has passed through CENSOR ..It’s India’s 1st LESBIAN background film ever since the honourable Supreme Court repealed section 377 ..Will be confirming release date soon …Watch Trailer https://t.co/jsnyRRUlIl pic.twitter.com/kODCqkD4UD
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 10, 2022