Kangana Ranaut On Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार, अभिनेत्री-निर्माती कंगना राणावत हिच्या प्रवेशाने हिमाचल प्रदेशपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण चांगलेच तापले आहे. तिने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपने एकीचा संदेश दिला असून, निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी कंबर कसली आहे.
कंगनासह भाजपनेही काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे कंगनाच्या मंडीच्या रणधुमाळीत एंट्रीमुळे काँग्रेसमध्येही उमेदवाराच्या चर्चेला उधाण आले आहे. कंगनाच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता तिच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मंडी ही कंगनाची जन्मभूमी आहे. । Kangana Ranaut On Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024
#WATCH | On Congress MP Rahul Gandhi’s ‘murder of democracy’ statements, BJP candidate from Mandi, Kangana Ranaut says, “If democracy is being murdered, what are we preparing for? Impressing people, requesting them for support, their trust & support for you, and their alignment… pic.twitter.com/79BSQ6sReK
— ANI (@ANI) April 1, 2024
काही दिवसांपूर्वीच मंडीत कंगनाने रोड शॉ देखील केला होता. यावेळी तिने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आता प्रसार माध्यमांशी बोलताना कंगनाने थेट काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना कंगना म्हणाली की, “राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असं म्हणत पलटवार केला आहे.
राहुल गांधी सतत देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असं म्हणतात. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं असा प्रश्न कंगनाला पत्रकारांनी विचारला. त्यावर कंगना म्हणाली की, “जर लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय? लोकांची मन जिंकणं, लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणं, लोकांना आपण सहकार्य करणं, त्यांचा तुमच्यावर विश्वास असणं.”
“प्रेम असणं, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का? हीच लोकशाही आहे. कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही.” भाजपा हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागा जिंकेल आणि आगामी निवडणुकीत ‘400 पार’ करण्याचं लक्ष्य गाठेल असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. । Kangana Ranaut On Rahul Gandhi