Smita Wagh On Unmesh Patil : जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्याने पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटात ते आणि त्यांच्या पत्नी प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे.पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची देखील भेट यावेळी घेतली. त्यानंतर आता स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी थेट मुंबईत पोहोचल्याने ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर स्मिता वाघ यांनी, मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेश पाटील हे असा काही निर्णय घेतील. त्यांनी राऊत यांची सदिच्छा भेट घेतली असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. | Smita Wagh On Unmesh Patil
कोणी कसं जीवन जगावं, हा ज्याचा त्याचा व्यक्ती प्रश्न असतो.पक्षासोबत एक निष्ठ राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्ते च्या पाठीशी जनता ही उभी राहील. भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे असं देखील स्मिता वाघ यावेळी म्हणाल्या. | Smita Wagh On Unmesh Patil
कोण आहेत उन्मेष पाटील ?
उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ते 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी खासदारकी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. | Smita Wagh On Unmesh Patil