IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : आयपीएल 2024 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मोसमात आरसीबीची कामगिरी अतिशय सामान्य आहे. या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून, दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. तर लखनौने दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला एकामध्ये विजय तर दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
या सामन्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे दोन्ही संघ भिडतील. आयपीएलमध्ये दोन्ही संघांचे रेकॉर्ड एकमेकांविरुद्ध कसे आहेत ते जाणून घेऊया.
#RCBvLSG जायंट्स ने IPL 2022 मध्ये पदार्पण केले, लखनौ आणि RCB विरुद्ध आतापर्यंत फक्त चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये फाफ डु प्लेसिसच्या संघाने तीन सामने जिंकले असून केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे.
#RCBvLSG : Head To Head Records….
लखनऊ सुपर जायंट्स ने IPL 2022 मध्ये पदार्पण केले, लखनौ आणि RCB विरुद्ध आतापर्यंत फक्त चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये फाफ डु प्लेसिसच्या संघाने तीन सामने जिंकले असून केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे.
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार ‘रोहित शर्मा’च्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद…
दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत
केएल राहुलला आरसीबीविरुद्ध खेळायला आवडते, त्याने त्यांच्याविरुद्ध 144.03 च्या स्ट्राइक रेटने 628 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे 141.41 च्या स्ट्राइक रेटने 181 धावा करत विराट कोहली या मोसमातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. लखनऊच्या मयंक यादवने PBKS विरुद्धच्या त्याच्या मागील डावात 145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी केली आणि तीन विकेट्स देखील घेतल्या. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होऊ शकते.