मुंबई – हिंदी सिनेसृष्टीतील ‘क्वीन’ कंगना राणावत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतीच अभिनेत्री ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसली. कंगनाने भारतीय खाद्यपदार्थाबद्दलच्या तिच्या प्रेमाबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर दिले. कंगनाची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडिया जगतात व्हायरल होत आहे.
डॅनियल नावाच्या व्यक्तीने भारतीय पदार्थांनी सजवलेल्या अन्नाच्या थाळीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘मला बेसिक इंडियन फूड आवडते, ते खूप चांगले आहे.’ यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी लिहिले लिहिले, ‘खरं आहे.’ यानंतर मस्क यांचे ट्विट रिट्विट करत कंगनाने त्यांचे कौतुक केले आहे.
I love basic bitch Indian food it’s so insanely good pic.twitter.com/FJmjgL2H3e
— Daniel (@growing_daniel) May 16, 2023
मस्क यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने लिहिले की, ‘आम्ही तुम्हाला लाईक करण्यासाठी तुम्ही अजून किती करणे द्याल’. मस्क यांचे ट्विट शेअर करून कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने इंडायरेक्ट पद्धतीने केलेली स्वतःची स्तुती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकरी यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले लवकरच टेस्लाचे भारतात उत्पादन सुरु होणार आहे म्हणून मस्क यांची हवा आहे. तर दुसऱ्याने लिहिलं यासाठीच कंगना फेमस आहे.
How many more reasons will you give us to like you more and more 🙂🤗
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 16, 2023
कंगना अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये इलॉन मस्कवर कमेंट करताना दिसते. गेल्या वर्षी कंगनाने ट्विटरवर आल्यानंतर मास्क यांचे कौतुक केले होते. आता देखिल तसेच काहीस घडल्याने कंगना पुन्हा एकदा कॅचर्चेत आली आहे.