मुंबई – बॉलीवूडची पंगा क्वीन अर्थात कंगणा राणावत आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर तिने निशाणा साधला आहे. त्यानंतर आता तिने सोनम कपूरला सडेतोड उत्तर दिले आहे. काही वर्षांपूर्वी सोनम कपूरने कॉफी विथ करणमध्ये कंगनाच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. कंगनाने आता तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सोनमच्या एपिसोडची एक क्लिप शेअर केली करत बॉलिवूड माफियांविरोधात स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.
या व्हिडीओमध्ये सोनमला चांगली इंग्रजी बोलण्याची पॉवर तु कोणाला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती कंगनाचे नाव घेते. यावर पलटवार करत कंगणा म्हणते की, “मी गेल्या काही वर्षांपासूनफिल्ममाफियांविरोधात आवाज उठवत आहे. यातून मी एकच शिकले की बाहेरुन इंडस्ट्रीत आलेल्या कोणाही व्यक्तीला त्याच्या इंग्रजी भाषेवरुन आता कोणीच हिणवू शकत नाही. तो शो आता अधिकृतरित्या बंद झाला आहे.”
कंगनाने पुढे लिहिले, “मी शेवटी त्यांना दिलेलं सडेतोड उत्तर बघायला विसरु नका. 24 व्या वर्षी मला ज्याप्रकारे हिणवलं गेलं तरी मी ज्या आत्मविश्वासाने आणि माणुसकीने वागले. हे इंग्लिश बोलणाऱ्या या गॉसिप आँटींना कधीच जमणार नाही.”
दरम्यान, कंगना आता ‘इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तिचा ‘तेजस’ हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कंगना पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.