मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. गेल्या वर्षी क्रिती सेननच्या दिवाळी पार्टीत एकत्र आल्यापासून त्यांच्या लिंकअपच्या बातम्या चर्चेत आहेत. यानंतर खुद्द आदित्यनेही करण जोहरच्या चॅट शोमध्ये याचे संकेत दिले होते. त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने सांगितले की, आदित्य रॉय कपूर एका मुलीला डेट करत आहे जिचे नाव ‘अ’ ने सुरू होते.
मात्र, खुद्द अनन्या आणि आदित्यनेच याबाबत मौन बाळगले आहे. पण, हे जोडपं हळुहळू याविषयी खुलासा करत असल्याचं दिसतंय. नुकतेच दोघेही स्पेनमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले. डेटिंगच्या अफवांदरम्यान, अनन्या – आदित्य रॉय कपूर यांनी अलीकडेच एका आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. अनन्या आणि आदित्यनेही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फोटो शेअर केले आहेत. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती स्पेनमधील आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टच्या संगीत मैफिलीचा आनंद घेताना दिसली. त्याचवेळी आदित्य रॉय कपूरनेही याच गायकाच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून ते दोघेही एकत्र स्पेनमध्ये वेळ घालवत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहे
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, आदित्य रॉय कपूर सध्या अनुराग बसूचा आगामी चित्रपट ‘मेट्रो इन दिनन’ मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ‘लाइफ इन ए… मेट्रो’चा सिक्वेल आहे. त्याचबरोबर अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे.