बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावले. कंगनाच्या कोणत्याही चित्रपटात तिची अभिनय प्रतिभा स्पष्टपणे दिसून येते. आता नुकताच कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. अशात आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून पंतप्रधानांना कृष्ण अवतार म्हटले आहे.
कंगनाने मोदींना कृष्ण अवतार समजण्या मागचे कारणही सांगितले आहे, ती म्हणाली, ‘मी असे म्हणण्याचे कारण आहे की, प्रत्येकाची एक प्रतिमा असते तशीच आपल्या देशतील मोदी यांची प्रतिमा आहे, आपल्यासाठी ते कृष्णाचा अवतार आहे. मोदी काही सामान्य माणूस नाही. या देशाच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म झाला.’
अलीकडेच एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की, ‘तिचे आवडते व्यक्ती पीएम मोदी आहेत. जेव्हा तिला विचारले गेले की ती नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी कोणत्या पंतप्रधानाची सर्वात जास्त प्रशंसा करते. यावर कंगनाने लगेच उत्तर दिले, ”माझे आवडते पंतप्रधान… माझी आवडती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी” आहेत.
जेव्हा तिला मुलाखतीत सांगण्यात आले की या विधानामुळे तिला ट्रोल केले जाऊ शकते यावर कंगना म्हणाली, ‘मला ट्रोल केले जात आहे, माझी त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही.’ आपल्या विधानामागील तर्क सांगताना कंगना पुढे म्हणाली, ‘जे असत्याच्या सोबत आहेत. माझे शब्द त्यांच्यासाठी बाम म्हणून काम करतील. तसेच श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा सुदामाने त्यांच्याबद्दल सांगितले होते की तो देव आहे, पण दुर्योधन म्हणाला होता की तो देव नाही तो दिवसभर महिलांसोबत नाचतो, गप्पागोष्टी करतो आणि त्याला दुसरे काही काम नाही. त्यामुळे तुमचा विश्वास चांगला नसेल तर तुम्ही सर्वशक्तिमान देवाचाही अनादर करू शकता.’ असं म्हणत तिने आपलं मत मांडलं आहे.