“कंगनाला इतकी किंमत देण्याची गरज नाही”- बच्चू कडू

मुंबई – सिनेअभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद मुंंबईत काही दिवस प्रचंंड चर्चेत होता अजुनही त्यावर उत्तर असे समोर आलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच कंगना मुंबईवरून पुन्हा आपल्या मूळ गावी मनालीला परतली आहे. दरम्यान, घरी पोहचल्यानंतर देखील कंगना रोज ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहे.

अशातच बच्चू कडू यांनी सुद्धा बॉलिवूडच्या या बहुचर्चित ‘क्वीन’वर निशाणा साधला आहे. “एका अभिनेत्रीमुळे राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शिवसेनाचा वाघ तिथं बसला आहे. माध्यमांनीही या अशा अभिनेत्रीला इतकी किंमत देण्याची गरज नाही, जिची कवडिची ही किंमत नाही”. असं ते म्हणाले.

इतकंच नव्हे तर कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभे केले, तर तिचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत त्यांनी कंगनाची खिल्ली उडवली.

Leave A Reply

Your email address will not be published.