लॉकडाऊनच्या काळातही वेतनवाढ

51 कामगार कायम : भारतीय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनात करार 

पिंपरी – लॉकडाउनच्या काळात उद्योगनगरीतील हजारो कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र असतानाच हिंजवडी येथील ओमानी ऍक्‍टिव्ह हेल्थ टेक्‍नॉलॉजिस प्रा. या कंपनीत 51 कामगारांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांना किमान 10 हजार 234 तर कमाल 16 हजार154 रुपयांची घसघशीत वेतनवाढ देण्यात आली आहे. भारतीय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनात नुकताच वेतनवाढ करार पार पडला. 

या वेतनवाढ करारामध्ये कामगारांशी संबंधित विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. दिवाळी बोनसच्या 9300 रकमेत वाढ करुन ती 14 हजार 672 रुपये करण्यात आली आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना दीड लाखांच्या आरोग्य विम्याचे कवच देण्यात आले असून, वर्षभरात 23 पगारी
सुट्टयादेखील देण्यात आल्या आहेत.

या करारप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, शुभम दिघे, बाजीराव शिंदे, आबासाहेब यादव, मच्छिंद्र कळमकर, पवन कांबळे, योगेश पाडेकर, रोहिदास गराडे, एकनाथ दवन तर व्यवस्थापनाकडून अभय तुलापुरकर, अंबु गांधी, मकरंद भालेराव, अभिजीत थोरात उपस्थित होते. 

कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेला हा वेतनवाढ करार कंपनीतील कामगारांचे मनोबल वाढविण्याबरोबरच उद्योगनगरी व आयटी हबमधील कामगार क्षेत्राला उर्जा देणारा आहे, असे मत डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्‍त केले. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.