कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील बेळगाव सीमावादाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून बेळगाववरून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमधून वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. अशातच कांनडीगांनी एका एसटीवर कन्नड पोस्टर लावले असून गाडीवर काळी शाईही ओतली आहे.
कन्नड संघटनांनी थयथयाट सुरूच ठेवला असून गुलबर्गा-सोलापूर एसटीवर थांबवून कन्नड पोस्टर लावण्यात आले. तसेच, एसटीवर चढून लाल पिवळा झेंडा फडकावत कांनडीगांनी हैदोस घातला. याशिवाय गाडीवर काळी शाईही ओतली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद चिघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमावेळी व्यक्त केला होता. यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. महविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली होती.