वॉशिंग्टन – डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाल्याच्या घटनेवर प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देताना त्यांचे पती डग्लस एमहॉफ यांनी म्हटले आहे की, कमला या लोकांसाठी रोजच न्यायाची लढाई लढत आहेत. त्या अमेरिकेच्या उत्तम उपाध्यक्ष बनतील असा मला विश्वास वाटतो.
55 वर्षी एमहॉफ डग्लस हे लॉस एंजल्स येथे वास्तव्याला असून तेथील करमणूक उद्योगासाठी ऍटर्नी म्हणून ते काम करीत आहेत. सध्या त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी सुट्टी घेतली आहे.
त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की ज्यो बिडेन आणि कमला हॅरिस ही जोडी अमेरिकेसाठी अत्यंत लाभदायी नेतृत्वाची जोडी ठरेल. डग्लस आणि कमला हॅरिस यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. डग्लस यांनी आपल्या आधीच्या पत्नीला घटस्फोट दिला असून त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत.
त्यांनी आपल्या कमला यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना म्हटले आहे की, त्या गेली अनेक वर्षे केवळ लोकांसाठीच लढत असताना मी पाहात आलो आहे. त्यांच्या समर्थनासाठी आपल्याला आणखी अधिक काम करावे लागेल, असे नमूद करतानाच त्यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली