मुंबई – अभिनेता सुशांत सिंहला जाऊन बराच काळ आता लोटला आहे. बॉलिवूड आता बरंच पुढे निघून गेलेलं असताना देखील सुशांतची आठवण मात्र काढल्याशिवाय राहत नाही. बॉलिवूडमधील कोणी ना कोणी व्यक्ती त्याच्या नावाचा उल्लेख करताना दिसून येत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या कमाल आर खानने आता सुशांतचे नाव घेत एक ट्विट केले आहे.
यापूर्वी केआरकेला जुन्या ट्विटसाठी अटक करण्यात आली होती आणि त्याने काही दिवस तुरुंगातही घालवले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरके सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा कमी सक्रिय आहे. त्याने नुकत्याच केलेल्या एका ट्विटने.खळबळ उडवून दिली आहे.
केआरकेने ट्विट करून लिहिले, ‘जेलमध्ये माझी 20 टक्के स्मरणशक्ती गेली, मी सुमारे 10 दिवस अन्नाशिवाय होतो. माझ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझी स्मरणशक्ती परत येणार नाही पण भविष्यात ती अधिक जाऊ शकते. जर मी मेलो तर लोकांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी सुशांत सिंग राजपूतसोबत जे केले आता ते माझ्यासोबत करत आहेत.
यावेळी कोणाचेही नाव न घेता केआरकेने इंडस्ट्रीमधील नेपोटीझमबाबत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. केआरकेच्या या ट्विटनंतर अनेकांनी कमेंट करत हा त्याचा स्टंट असल्याचे म्हंटले आहे. यानंतर देखील केआरकेच्या ट्विटची मालिका सुरूच राहिली आहे. त्याने विविध विषयांवर भाष्य करत ट्विट केले आहेत.