‘ताहिर हुसेन यांच्याविरुद्ध कारस्थान’- अमानतुल्ला खान

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आम) आमदार अमानतुल्ला खान यांनी पुन्हा एकदा पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांचा बचाव केला आहे.

त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ताहिर हुसेनविरूद्ध कट रचला जात आहे. आमदार अमानतुल्ला खान म्हणाले की, ‘ताहिर हुसेन यांनी स्वत: 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांना हिंसाचारग्रस्त भागात बोलावले होते. नंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.

पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, ताहिर हुसेन यांना  मुख्य आरोपी म्हणून पुढे केले जात आहे. गुन्हेगारांना वाचवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे अमानतुल्ला खान म्हणाले.

यापूर्वी खान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले होते की, “ताहिर हुसेन केवळ मुस्लिम असल्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे.” मुस्लिम असणे हा आज हिंदुस्तानातील सर्वात मोठा गुन्हा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.