मुंबई – अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री काजोल यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आजही सिनेप्रेमींना मोहिनी घालतो. या चित्रपटातील शाहरुख व काजोलच्या केमिस्ट्रीवर त्यांचे चाहते आजही फिदा आहेत. मात्र आज जागतिक सायकल दिनानिमित्ताने अभिनेत्री काजोलने या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचा एक ‘ऍक्सीडेन्ट’ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
काजोलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ‘ये लड़का है दीवाना’ गाण्याचे चित्रीकरण सुरु असल्याचं दिसतंय. यामध्ये काजोल व शाहरुख एकमेकांच्या बाजूला सायकल चालवताहेत. काजोल आपली सायकल शाहरुखच्या सायकल शेजारी घेते. व पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो. हसत-खेळत चाललेल्या चित्रकारणादरम्यान काजोल अचानक सायकलवरून धाडकन खाली पडते. ती तोंडावर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
दरम्यान, काजोलने आज हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत, ‘आणि सर्वांना सायकल दिनाच्या शुभेच्छा’ असा उपरोधिक संदेश लिहला आहे.
काजोलच्या या व्हिडिओवर करण जोहरने देखील कमेंट केली असून कमेंटमध्ये त्याने, ‘हसण्याचे इमोजी पोस्ट करत आणि यापुढे काय झालं हे मी कधीही विसरणार नाही.’ असं म्हटलंय.
सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणाऱ्या काजोलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिची फिरकी घेणाऱ्या कमेंट्स पोस्ट केल्या आहेत.
View this post on Instagram