मुंबई – बॉलिवूड स्टार किड्सपैकी आर्य खाननंतर सध्या सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा. पार्टीत दिसल्यामुळे न्यासा चर्चेत येते तर कधी स्वतःच्या ट्रान्सफॉर्मबाबत चर्चा सुरु झाल्याने न्यासाचा विषय सोशल मीडियावर सुरु होतो. कदाचित यामुळेच चाहत्यांना तिच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा लागली आहे. अभिनेत्री काजोलने देखील आता याबाबत भाष्य केलं आहे.
‘सलाम वेंकी’ या आगामी चित्रपटात काजोल दिसणार आहे. यात काजोलने एका केअरिंग आईची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोलने एका हिंदी चॅनलशी गप्पा मारल्या. त्या दरम्यान तिला न्यासाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आले आणि तिने देखील मनमोकळेपणाने त्याची उत्तरे दिल्याचे दिसून आले.
न्यासाचा डेब्यू कधी होणार ? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र काजोल याबाबत म्हणते, “सध्या न्यासा आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीमध्ये येईल असं मला वाटत नाही”. तसेच यावेळी काजोलने सोशल मीडियाबाबत देखील भाष्य केलं. मी ट्रॉलर्सना अजिबात भाव देत नसल्याचे काजोलने यावेळी स्पष्ट केले.