मुंबई – बॉलीवूड किंग ‘शाहरुख खान’ अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. दिवाळीत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अभिनेत्या जेव्हा पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता, तेव्हा पासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अश्यातच, आज पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे. नुकतंच, शाहरुखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ‘पठाण’ चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेरसिकांना हा चित्रपट चार भाषांमध्ये पाहता येणार आहे.
Hold on tight, the ride is about to get bumpy! #55DaysToPathaan
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January, 2023. Releasing in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/2gos7T2S7U— Yash Raj Films (@yrf) December 1, 2022
यावेळी वेळी अभिनेत्याने चित्रपटाचे आणखी एक पोस्टर शेअर केले असून, यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राम यांचा देखील दमदार अवतार पाहायला मिळत आहे. हे पोस्टर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज करण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये शाहरुख खान हातात बंदूक घेतलेला दिसत आहे. सोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील हातात बंदूक घेतलेले दिसत आहेत. या पोस्टरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. पठाण हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे.