Kajol – अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, अशात आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काजोलचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काजोल तिचा आउटफिट बदलताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
वृत्तानुसारनुसार, हा व्हिडिओ काजोलचा नसून काही सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्याचा आहे. हे जून २०२३ मध्ये सोशल मीडियावर ‘गेट रेडी विथ मी’ (GRWM) ट्रेंड अंतर्गत अपलोड करण्यात आले होते. हा मूळ व्हिडीओ याआधीच ‘टीकटॉक’ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने याची शहानिशा करणं सोप्पं झालं असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
अद्याप या मूळ व्हिडीओतील सोशल मीडिया क्रिएटरची ओळख समोर आलेली नसली तरी ‘क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार हा मूळ व्हिडीओ रोजी ब्रीन या सोशल मीडिया क्रिएटरचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता या डीपफेक व्हिडिओवर काजोलच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काजोलचे चाहते तिच्या स्पोर्टमध्ये उतरले आहे,
काजोलच्या वर्कफ्रंट बाबत सांगायचे झाल्यास, या वर्षी ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. सध्या ती ‘सरजमीन’ आणि ‘दो पत्ती’चे शूटिंग करत आहे.