बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल या दोघांनी 1992 मध्ये बेखुदी आणि दिवाना या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. मात्र अब्बास-मस्तानच्या बाजीगर या चित्रपटाने या दोघांचे करिअर नव्या उंचीवर नेऊन ठेवले. 1993 मध्ये आलेल्या बाजीगरला 14 नोव्हेंबर रोजी 26 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या यशामध्ये यातील गाण्यांचाही वाटा मोठा ठरला.
त्याकाळातच नव्हे तर आजही बाजीगरमधील गाणी आवडीने म्हणणारा-ऐकणारा मोठा वर्ग आहे. ये काली काली आँखे हे यातील एक हिट ठरलेले गाणे. नुकतेच काजोलने इंन्स्टाग्राम अकौंटवर या गाण्याविषयी एक मजेदार गोष्ट लिहिली ाअहे. ती सांगते की माझे डोळे आजही काळे नाहीत. असो, पण हे गाणे एका अशा अभिनेत्रीच्या करिअरमधील सुपरहिट आणि सदाबहार गाणे ठरले जिचे डोळे कधीही काळे नव्हते. नेटकऱ्यांनी आणि काजोलच्या चाहत्यांनीही यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाजीगरच्या यशानंतरच या जोडगोळीला घेऊन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बनवण्यात आला आणि या चित्रपटानेही यशाचे शिखर गाठले.