सातारा – धोम-वाई खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या जामिनास पुढील सुनावणीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत दुपारी ज्योती मांढरेचा उलट तपास घेण्यात आला.
या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक वाई न्यायालयात उपस्थित होते. आरोपी संतोष पोळ यालाही न्यायालयात आणण्यात आले. न्यायालय परिसरात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने एक वर्षापूर्वी जमीन मंजूर केला होता. त्याची मुदत गुरुवारी संपली. तिने पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव जमीन नियमित होण्यासाठी अर्ज सादर केला.