जुन्नर – जुन्नरमध्ये शिवजयंती उत्सव बैलगाडा समिती आयोजित बैलगाडा शर्यतीचा थरार जुन्नरकरांना अनुभवायला मिळाला. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अनाजी धोंडजी बुट्टे पाटील ट्रस्टच्या मैदानावर झालेल्या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक, शेतकरी तसेच नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती.
आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शर्यतींचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हातून आलेल्या नागरिकांनी स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. आमदार अतुल बेनके यांच्या बैलगाड्याने 11.17 सेकंद वेळ नोंदवत घाटाचा राजा किताब मिळवला. आमदार बेनके यांच्या बारीची विशेष चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती. बैलगाडा मालक राकेश खैरे यांनी आमदार अतुल बेनके यांच्या नावाने टोकन घेतले होते.
पंचायत समिती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, देवराम लांडे, बाजीराव ढोले, नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, आप्पासाहेब बुट्टे पाटील, फिरोज पठाण, राकेश खैरे, जितेंद्र कबाडी, नितीन कबाडी, प्रकाश कबाडी, गणेश कंठाले, अनिल रोकडे, रोहित बुट्टे, प्रकाश आरोटे आदींनी शर्यतीचे नियोजन केले होते. या शर्यतीसाठी सुमारे 300 बैलगाडा मालकांना सहभाग नोंदविला असल्याचे समितीचे सदस्य नगरसेवक भाऊ कुंभार यांनी सांगितले.