पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रम साधेपणाने व अल्प उपस्थितीत साजरे करण्यात आले होते. त्या तुलनेत आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुन्नरचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाऊ कुंभार, म.पा. काजळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव तसेच सर्व नगरसेवक व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.