नवी दिल्ली – यंदाच्या 72व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावरील पथसंचलनात भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम दिसून आला. महाराष्ट्राच्या वतीने “वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी झाले.