सातारा – सरगर चॅरिटेबल ट्रस्ट, माधवबाग डायग्नोस्टिक सेंटर सातारा, श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय व माऊली ब्लड बँकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त देशमुखनगर येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २३५ हून अधिक जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
शिबिरात वजन, पोटाचा घेर, रक्तगट तपासणी, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, सर्वसाधारण तपासणी तसेच मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शंभरहून अधिक जणांची नेत्र तपासणी, ८० हून अधिक लोकांनी सर्वसाधारण तपासणी, २० मोतीबिंदू रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचार पध्द्तीची माहिती देण्यात आली.
या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास सरगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास सरगर, उपाध्यक्षा सौ. शीतल सरगर उपस्थित होते. माधवबागचे डॉ. देवकी पळणिटकर, माऊली ब्लड बँकेचे डॉ. भट्टड, शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या सौ. निकिता देशमुख यांचे सहकार्य लाभले. भविष्यात ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सरगर चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते, अशी माहिती यावेळी रामदास सरगर यांनी दिली.