“हिरामंडी’मध्ये जुहीची एंट्री

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळीने सिनेसृष्टीत तब्बल 25 वर्षे पूर्ण केली आहेत. काही दिवसांपूर्वी भन्साळी यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍ट “हिरामंडी’ या वेब सीरिजची घोषणा केली होती. या बहुचर्चित सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, निम्रत कौर, मनीषा कोईरालासारख्या तगड्या कलाकारांची फळी झळकणार आहे. आता या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री जुही चावलादेखील झळकणार असल्याचे समजते.

“हिरामंडी’मध्ये एकूण 18 मुख्य अभिनेत्री झळकणार आहेत. या सीरिजमध्ये एकूण आठ एपिसोड असणार आहेत. यापैकी एका महत्त्वपूर्ण एपिसोडमध्ये जुहीचा कॅमियो रोल असणार आहे. जुहीची नुकतीच संजय लीला भन्साळी सोबत या रोलबाबत चर्चा झाली असून, जुहीने होकार दिला आहे.

या नव्या वेबसीरिजमुळे गेल्या काही दिवसांपासून भन्साळी सोशल मीडियावर चर्चेत होते. “हिरामंडी’मधून लाहोरच्या वेश्‍यांची गोष्ट या वेबसीरिजमधून उलघडली जाणार आहे. या सीरिजमध्ये लाहोरबरोबरच हिरामंडीदेखील दिसणार आहे. हिरामंडीमधून भन्साळी एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.