मल्याळम “इझरा’च्या हिंदी रिमेकमध्ये इमरान हाश्मी लवकरच दिसणार आहे. या हिंदी रिमेकचे नाव “डिबेक’ असे असणार आहे. हा एक हॉरर सिनेमा असणार आहे. इमरानने अगोदरच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
2019 मध्ये मॉरिशसमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते. सिनेमाचे डायरेक्टर जया कृष्णन यांनीच मामुट्टीबरोबरच्या मल्याळम सिनेमाचे डायरेक्शन केले होते. “डिबेक’च्या निर्मात्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करायचा होता.
मात्र, सध्याची परिस्थिती आणि थिएटरना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता आता हा सिनेमा डिजिटल माध्यमातून रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 36 कोटी रुपयांना या सिनेमाच्या रिलीजचे हक्कविकले गेले आहेत.
दरम्यान, सलमान आणि कतरिनाच्या “टायगर 3’मध्ये इमरान असणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्वतः इमरान हाश्मीनेच याबाबतची संदिग्धता वाढवून ठेवली आहे. तो या सिनेमात व्हिलन करत असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. मात्र, आपण या बातमीचे समर्थनही करणार नाही आणि खंडनही करणार नाही, असे म्हणून इमरानने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.