मुंबई – अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून घराघरात पोहचली. तिच्या विनोदी शैलीने ते प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. यानंतर आता वनिता एका मालिकेमध्ये झकळणार आहे. विशेष म्हणजे वनिता खरात पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेचे नवीन पर्व सुरू झाले असून या मालिकेत वनिता झळकणार आहे. सुंदरी मालिकेच्या नवीन पर्वात सुंदरीच्या आयुष्याचा नवीन आणि आव्हानात्मक प्रवास सुरु झाला आहे. यातच आता ‘साहेब’ भूमिकेच्या निमित्ताने वनिता पहिल्यांदाच खलनायिका म्हणुन समोर येणार आहे. या मालिकेत तीची भूमिका बेधडक, जिगरबाज अशी असणार आहे.
नुकताच वनिताच्या भूमिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला यात वनिता दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तू जरी असली कलेक्टर तरी कायदा हा साहेबाचा चालतो, असा डायलॉग वनिता या प्रोमोमध्ये बोलत असल्याचे पाहायला मिळते. वनीताच्या या जबरदस्त भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
दरम्यान, वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सह शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात झळकली. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता वनिता खरात ‘सुंदरी’ या मालिकेत झळकणार आहे.