नवी दिल्ली – काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आल्यानंतर राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न चर्चेत आला आहे. त्याचवेळी यासंदर्भात आज संध्याकाळी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. दिल्लीत मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाले असले तरी. काँग्रेस हायकमांडला पंजाबसारखी चूक पुन्हा करायची नाही, त्यामुळे आमदारांची जात, प्रदेश आणि मतानुसार विभाजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हायकमांड निर्णय घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून आता नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
या नव्या फॉर्म्युल्यानुसार सीपी जोशी यांच्याकडे राजस्थानचे मुख्यमंत्री, गोविंद सिंग दोतसरा यांना उपमुख्यमंत्री आणि सचिन पायलट यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच या फॉर्म्युल्यानुसार पुढील निवडणुकीची जबाबदारी फक्त सचिन पायलन हेच घेणार आहेत. दुसरीकडे, सरकारची पुनरावृत्ती झाल्यास ते मुख्यमंत्री होतील. पुढच्या वर्षी 2023 मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
आज जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक
राजस्थानमध्ये (रविवारी संध्याकाळी ) आज ७ वाजता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत गेहलोत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर नेतृत्व बदलाबाबत चर्चा होणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (SICC) संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी सांगितले की, ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सरचिटणीस अजय माकन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.’
दोन दशकांहून अधिक काळानंतर अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा सामना काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. थरूर यांनी शनिवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातून उमेदवारी अर्ज स्वीकारला होता. काँग्रेसने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.