मुंबई – राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्धच्या लढतीत 47 चेंडूंमध्ये सहा षटकारांच्या मदतीने 70 धावांची नाबाद खेळी केली. या डावात त्याने फलंदाजीमध्ये अनेक विक्रम केले.
बेंगळुरुविद्धच्या सामन्यात तो पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहिला व टी-20 क्रिकेट सामन्यात अशी कामगिरी करणारा यंदाच्या मोसमातील पहिलाच फलंदाज ठरला.
त्याने 70 धावांच्या खेळीत एकही चौकार फटकावला नाही, ही देखील एक विक्रमी कामगिरीच ठरली. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करुन एकही चौकार न मारता केवळ सहा षटकार लगावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.