“ढिश्यूम’च्या शूटिंगच्यावेळचे काही किस्से वरुण धवनने अलीकडेच शेअर केले आहेत. या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी तो आणि जॉन अब्राहमने मिळून एकाच दिवसात तब्बल 21 कलिंगडे खाल्ली होती, असे त्याने सांगितले. “ढिश्यूम’ला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने या सिनेमाबाबतच्या काही पडद्यामागच्या गोष्टी सांगितल्या.
त्याने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि जॉन अब्राहमचा या सिनेमातला एक लुकदेखील शेअर केला आहे. त्यात दोघेही आपली सिक्स्ड पॅक्ड बॉडी दाखवत उन्हात उघडे उभे असल्याचे दिसते आहे. हे दोघेही घोट्या इतक्या पाण्यात उभे आहेत. या सिनेमासाठी जी टीम काम करत होती, ती आपल्यासाठी आतापर्यंतची सर्वात बेस्ट टीम होती, असे वरुणने म्हटले आहे.
या सिनेमासाठी वरुणला त्याच्या दोन मोठ्या भावांनी खूप मदत केली होती. सिनेमाचे शूटिंग वाळवंटी भागात झाले होते. त्यामुळे उन्हाच्या त्रासापासून बचावण्यासाठी जॉन आणि आपण एकाच दिवसात 21 कलिंगडे खाल्ल्याचा किस्साही वरुणने सांगितला आहे.
View this post on Instagram
Thank you @dabbooratnani for a fantastic picture!!! @manishadratnani #DabbooRatnaniCalendar
या सिनेमाच्या सिक्वेलची आपण वाट बघत आहोत. म्हणजे त्या निमित्ताने आणखी कलिंगडे खाण्याची संधी मिळेल असे जॉनने देखील आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.