नवी दिल्ली: करोना विषाणूमुळे जगभरात विनाश झाला आहे. लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे तर सहा लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. करोनावर लस तयार करण्यासाठी अनेक देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यापैकी अमेरिका, ब्रिटन आणि चीनमधील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. अशातच आता चीनने ट्रायल दरम्यान आपल्या देशातील सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोलच्या (सीडीसी) प्रमुखांना देखील करोना प्रतिबंधक लस टोचली आहे.
चीनच्या सीडीसीचे प्रमुख गाओ फू यांनी स्वतःच करोना प्रतिबंधक लस टोचली असल्याची माहिती दिली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाल्याशिवाय कोणीही लस सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी लस असुरक्षित देखील ठरू शकते,या से त्यांनी सांगितले आहे.
अहवालानुसार, प्रथम ही लस सरकारी कर्मचार्यांना दिली जाणार आहे. यामुळे लोकानांही लसीसाठी तयार करण्यात येईल.