गॅले – श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने आपल्या नावे विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. श्रीलंका संघाविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकाविणारा जो रूट हा इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला आहे.
गॉल स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रुटने 291 चेंडूत द्विशतक ठोकले. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार खेचला. कसोटी कारकिर्दीतील रूटचे हे चौथे द्विशतक आहे.
दरम्यान, श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने रूटच्या द्विशतकाच्या मदतीने पहिल्या डाव 8 बाद 403 धावांवर घोषित केला. रूटने 321 चेंडूत 223 धावांची खेळी केली.