राजपथावर नव्हे तर ‘या’ ठिकाणी निघणार ‘ट्रॅक्‍टर रॅली’; 1000 ट्रॅक्टर रेडी

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलकांनी येत्या 26 जानेवारीला राजपथावर ट्रॅक्‍टर रॅली आयोजित केली आहे. ती रॅली रद्द करावी अशी सुचना सर्वोच्च न्यायालयानेही केली असताना आंदोलक शेतकऱ्यांनी मात्र ही रॅली रद्द करण्यास नकार दिला आहे.

या रॅलीसाठी शेतकऱ्यांनी एक हजार ट्रॅक्‍टर जमवले आहेत. तथापि आम्ही आता 26 जानेवारीला राजपथावर होंणाऱ्या संचलनात अडथळे न आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आऊटर दिल्ली रिंगरोडवर ही रॅली आयोजित केली जाईल असे एका शेतकरी नेत्याने सिंघु बॉर्डरवर सांगितले.

आम्ही राजपथावरील संचलनात अडथळे न आणता दिल्लीच्या बाहेरच्या रस्त्यावर ही रॅली आयोजित करणार असल्याने त्याला पंजाब आणि हरियानाचे सरकार सहकार्य करील अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.