लोणी काळभोरमध्ये बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन
लोणी काळभोर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर म्हणाले की, रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकली आहे. त्याचा हवेली तालुका शिवसेना निषेध करीत आहे. यावेळी रामदास कदम यांच्या निषेधार्थ या रामदास कदमाचे करायचे काय, खाली डोके वर पाय, पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारुन फोटो जाळण्यात आला.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, तालुका संघटक तानाजी कुंजीर, तालुका सल्लागार ज्ञानेश्वर माथेफोड, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, विभाग प्रमुख ओम काळभोर, सुभाष कुंजीर, शाखाप्रमुख राम गावडे, युवासेना विभाग प्रमुख अजय माने, ाजेंद्र जोशी, शिवाजी काळभोर, सागर राखपसरे, पिंटू पाटील, युवराज माने, बबलू राऊत, गणेश काळभोर, अक्षय बिरादार व शिवसैनिक उपस्थित होते.