नवी दिल्ली- आॅईल इंडिया लिमिटेडमध्ये अनेक पदांची भरती जारी केली आहे. त्यात महत्वाचे म्हणजे ही भरती आसामच्या मुलियाजन येथील मुख्यालयासाठी आहे. या भरती अंतर्गत 36 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी oilindia.com या वेबसाईटवर संपुर्ण माहिती मिळू शकेल.
18 सप्टेंबर 2020 ही अर्ज गाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या पदांसाठी वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 30 वर्षे आहे तर ओबीसी साठी कमाल वय 33 तर अनुसुचित जाती / जमातीसाठी 35 वर्षे आहेे.
या भरतीसाठी उमेदवारांची नियुक्ती लेखी परीक्षा व अवजड वाहन ड्रायव्हिमगच्या टेस्टच्या आधारे केली जाणार आहे. कोरोना काळात अनेकांनी अपल्या नोकऱ्या गमावल्या. भारतातच नाही तर जगात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या काळात सरकारी कंपन्या, बँका किंवा रेल्वेत नोकरीसाठी संधी उपलब्ध करुन देत आहेत.