NIA Recruitment 2024 – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये (NIA) सध्या इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. ही अर्ज प्रक्रिया अधिसूचना जारी झाल्यापासून 60 दिवसांपर्यंत सुरु आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट https://nia.gov.in/recruitment-notice वर जाऊन अधिसूचना पहावी. अर्जाची प्रक्रिया 22 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे.
NIA या रिक्त पदांद्वारे एकूण 119 पदांची भरती करणार आहे. त्यानुसार निरीक्षकांच्या 43 पदांवर, उपनिरीक्षकाच्या 51 पदांवर आणि सहायक उपनिरीक्षकाच्या 13 जागांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. याशिवाय हेड कॉन्स्टेबलची 12 पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
NIA सब इन्स्पेक्टर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडून अनुभवही मागविण्यात आला असून, त्याची माहिती अधिकृत अधिसूचनेत उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही इतर पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा इत्यादी तपासण्यासाठी एनआयएच्या या https://nia.gov.in/recruitment-notice अधिकृत वेबसाईला भेट द्या.